पाकातील रव्याचे लाडू - Pakatla Rava Ladu

पाकातील रव्याचे लाडू - Pakatla Rava Ladu



दिवाळीच्या फराळातील पाकातील रव्याच्या लाडूची सोपी, सविस्तर आणि खात्रीशीर पाककृती मी देत आहे. पाकातले लाडू म्हटल्यावर खूप जणांना टेंशन येत ते न घेता मी दिलेल्या उपयुक्त टिप्स वापरून करून बघा, नक्की चांगले मऊ होतात लाडू.
चला तर करूया सुरुवात. यासाठी लागणार साहित्य पाहून घेऊ.

=========== साहित्य =============
  • बारीक रवा - १ किलो
  • ओलं खोबरं - १ मध्यम आकाराचं नारळ
  • तूप - २०० ग्रॅम
  • साखर - ७५० ग्रॅम
  • वेलची पावडर
  • मनुका - सजावटीसाठी
  • चारोळी - २५ ग्रॅम
  • दूध - १ वाटी
=========== कृती ============
--- प्रथम आपण जाड बुडाच्या कढईत थोडं तूप घेऊन त्यात थोडा रवा थोडा भाजून घ्यायचा.
--- रवा थोडा भाजला कि त्यात थोडं ओलं खोबरं घालून चांगलं खमंग भाजून घ्या.
रवा आणि खोबरं चांगलं एकजीव होत.
--- मी एक किलो रवा, तूप आणि खोबरं थोडं थोडं असं तीन भागात चांगलं भाजून घेतलं आहे.
--- आता आपण साखरेचा पाक करून घेऊया. याकरता पातेलीत पाऊण किलो साखर घेऊन त्यात १ ग्लास किंवा दीड कप पाणी घालून एकतारी पाक करायला ठेऊया.
--- गॅसची फ्लेम फुल ठेऊन साखर आणि पाणी चांगलं मिक्स करून घायचं नाहीतर साखर तळाला चिकटून राहते.
--- साखर पूर्ण विरघळे पर्यंत मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहा.
--- पाकला उकळी आली कि विशेष लक्ष ठेवायचं आणि मध्ये मध्ये एक तारी पाक झालाय का ते चेक करायचं.
--- याकरता थोडा पाक चमच्याला घेऊन अंगठा आणि तर्जनी च्या सहाय्याने एक तर येते का ते पहायचं.
--- पाक झालाय का चेक करत असताना बाजूला एका वाटीत थोडं पाणी ठेवायचं पाक खूप गरम असल्याने बोटं त्यात लगेच बुडवता येतात.
--- एकतारी पाक तयार झाला कि गॅस बंद करून पातेलं गॅस वरून खाली उतरवा.
--- आता पाकात एक वाटी दूध घालून मिक्स करून घ्या.
--- भाजलेला रवा आणि वेलची पावडर घालून एकजीव करून घ्यायचं आणि पातेलीवर झकन ठेऊन रवा पाकात मुरुद्या.
--- १५ ते २० मिनिटांनी तुम्हाला लाडूत काही ड्राय फ्रुट्स घालायचे असतील तर घालून घायचे मी चारोळ्या घातल्या.
--- ड्राय फ्रुट्स घालून परत झाकण ठेऊन द्यायचं.
--- पाक आणि रवा एकत्र केल्यापासून अर्ध्या ते पाऊण तासाने पातेलीतलं लाडुच थोडं मिश्रण परातीत किंवा ताटात घेऊन बाकी मिश्रणावर लगेच झाकण ठेऊन द्या. ज्यामुळे ते मिश्रण कोरड होणार नाही.
--- लाडुच मिश्रण चांगलं एकत्र करून त्याचे लाडू वळायला सुरुवात करायची.


--- लाडुच मिश्रण थोडं थोडं घेऊन सर्व लाडू वळून घ्या.
--- पाकात दूध घातल्यामुळे आपण पहिला लाडू वळताना जस मिश्रण असत अगदी ते शेवटचा लाडू वळतानाही तसच रहात. आणि लाडू मस्त मऊ होतात.


--- झाले आपले पाकातले मस्त मऊ रवा लाडू तयार.

Comments

  1. Khupach Chan tumhala karta na bhagun ase vate lagech karayla gheu

    ReplyDelete

Post a Comment