कांदा खोबरं गरम मसाल्याचे वाटण - Watan - gravy masala


उसळ, मिसळ कट, चिकन मटण मसाला, अंडा मसाला अशा अनेक पाककृतींमध्ये उपयुक्त ठरणारे असे हे कांदा खोबरं गरम मसाल्याचे वाटण. जे फ्रिजमध्ये दीर्घकाळ टिकते.
चला तर करूया सुरुवात. यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया.
=========== साहित्य =============

  1. कांदे - २ मोठे
  2. सुखं खोबरं - १ कप
  3. लसूण पाकळ्या - ७ ते ८
  4. आलं - अर्धा इंच तुकडा
  5. लवंग - २
  6. काळीमिरी - ५ ते ६
  7. दालचिनी - १ इंच तुकडा
  8. बडीशेप - १ मोठा चमचा
  9. धणे - १ मोठा चमचा
  10. तेल - २ मोठे चमचे
=========== कृती ============
--- प्रथम कांदे उभे चिरून घ्या.
--- फुल गॅसवर जाड तवा ठेऊन त्यात तेल घाला.
--- तेलात चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या.
--- आता यात ७ ते ८ लसूण पाकळ्या घालून परता .
--- कांदा लसूण १ मिनिट परतून घ्या.
--- आता मधे थोडी जागा करून त्यात खडे मसाले घालूया. काळीमिरी, लवंग, दालचिनी, धणे, बडीशेप, आणि आलं मिक्स करून चांगलं परतून घ्या.
--- कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.
--- आता यात आपण सुकं खोबरं घालूया.
--- खोबरं घातल्यावर सतत चमच्याने हलवत रहा. गॅस फुल असल्याने जिन्नस करपू न देता खरपूस परतून घ्या.
--- वाटण व्ययस्थित भाजल्यावर गॅस बंद करा. पण तरीही वाटण चमच्याने हलवत रहा कारण, ताव गरम असतो.
--- वाटण ताटात काढून थोडं गर होऊ द्या.
--- मिक्सरमध्ये वाटण घेऊन पाणी न घालता वाटा.
--- २ ते ३ वेळा चमच्याने सारखं करून वाटण वाटून घ्या.
--- हाताने वाटण बारीक झालंय ना पाहून घ्या.
--- सुक्या खोबऱ्याला तेल सुटतं त्यामुळे पाणी न घालताही वाटण छान बारीक होत.
--- पाणी नसल्याने हे वाटण खूप दिवस टिकतं. त्याला आंबूस वास येत नाही.
आपलं वाटण आता तयार आहे. मग आज कसला बेत चिकन,मटण, उसळ की मिसळ.

Comments

  1. Hi, sukha khobra tumhi kisun bhajun fridge madhe thevta ki baher?

    ReplyDelete
  2. You can store without grinding in fridge & when it is ground, you need to store it in freezer.

    ReplyDelete

Post a Comment