काळ्या वाटाण्याची उसळ । Kalya Watanyachi Usal | black peas gravy


कोकणातील पारंपारिक व प्रसिध्द अशा काळ्या वाटाण्याच्या उसळीची उपयुक्त टिप्स सहित पाककृती मी या व्हिडीओत देत आहे.
चला तर मग करूया सुरुवात. यासाठी लागणार साहित्य पाहून घेऊया. यानुसार २ व्यक्तींसाठी उसळ होईल.
=========== साहित्य =============

  • काळे वाटणे - अर्धा कप
  • कांदा खोबरं गरम मसाला वाटण - ३ चमचे
  • लसूण पाकळ्या - १० ते १२
  • कडीपत्ता - ७ ते ८ पाने
  • हिंग - अर्धा चमचा
  • कोकम (आमसूल) - १
  • गूळ - अर्धा चमचा
  • लाल तिखट - २ मोठे चमचे
  • हळद - पाव चमचा
  • तेल - २ मोठे चमचे
  • मीठ
=========== कृती ============
--- काळे वाटणे भिजत ठेवताना चमचाभर मीठ घालून उमळत ठेवा.
--- उमळलेले वाटणे अंदाजे दुप्पट होतात.

--- कुकर मध्ये वाटणे घेऊन त्यात ३ कप पाणी, २ चमचे लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून शिजवून घ्या.

--- कुकरला ५ शिट्या काढा.
--- शिजलेल्या वाटाण्यातील थोडेसे (३ ते ४ चमचे) वाटणे थोडं पाणी घालून मिक्सर मधून पेस्ट करून घ्या.

--- गॅस फुल करून त्यावर पटेल गरम करून घ्या.
--- आता २ चमचे तेल घालूया.
--- तेल तापलं की त्यात ठेचलेल्या लसून पाकळ्या घाला.

--- आता कडीपत्ता आणि हिंग घालून फोडणी तयार करा.

---लसूण गोल्डन ब्राऊन झाला की फोडणी झाली असे समजा.
--- आपण कुकर ला शिजवलेले वाटणे त्यातील पाणी बाजूला काढून ते फोडणीत घाला आणि, लगेच झाकण घाला.
म्हणजे फोडणीचा खमंग वास वाटाण्यांना मस्त येतो.

--- आता झाकण काढून त्यात बाजूला काढलेलं वाटण्याचं पाणी घाला.

--- यात आपल्याला कांदा खोबरं गरम मसाला वाटण ३ चमचे घालायचं आहे.

कांदा खोबरं गरम मसाल्याचे वाटण रेसिपी लिंक https://youtu.be/H8ozGT623z8
--- आपण शिजवलेल्या वाटण्याची पेस्ट केलीय ती घालायची आहे. याने उसळीला छान दाटसरपणा येतो.

--- चांगलं मिक्स करून यात एक कोकम घाला.

--- चवीसाठी अर्धा चमचा गूळ घाला. (ऑप्शनल आहे. आवडत नसल्यास नाही घातला तरी चालेल.)
--- उसळीला जितका दाटसरपणा हवा त्या अंदाजाने उसळीत गरम पाणी घाला.
--- आता चवीनुसार मीठ घालून मंद गॅस वर ३ ते ४ मिनिट झाकण घालून उसळ शिजूद्या.

--- आता थोडी कोथिंबीर मिक्स करून गॅस बंद करा.

आपली कोकणातील पारंपारिक व प्रसिध्द अशी काळ्या वाटण्याची उसळ तयार आहे.

Comments