कोकणी कुर्ली / खेकडा रस्सा - Kurli Rassa
- कुर्ल्या (खेकडे) - १० ते १२ मध्यम आकाराच्या.
- लसूण - १० ते १२ पाकळ्या
- कांदा खोबरं गरम मसाला वाटण - अर्धा कप
- लाल तिखट - ४ ते ५ चमचे
- हळद - पाव चमचा
- तेल - ३ ते ४ चमचे
- कोकम (आमसुलं) - ३ ते ४
- मीठ
- कोथिंबीर
=========== कृती ============
--- प्रथम कुर्ल्या / खेकडे यांचे डेंगे (मोठे पाय) आणि छोटे पाय काढून घ्या.
--- कुर्ल्या / खेकडे स्वछ धुवून घेऊन त्याचे कवच काढा.
--- कुर्ली स्वछ करून घ्या.
--- कवचातील लाख बाजूला काढून घ्या (काळा भाग वगळून)
--- कुर्ल्यांचे छोटे पाय स्वछ धुऊन त्यात थोडं पाणी घालून मिक्सरमधून बारीक करून घ्या.
--- बारीक वाटलेल्या पेस्ट मध्ये कप भर पाणी घालून ते चांगलं गाळून त्याचा रस काढून घ्या.
--- गॅसवर पातेलं ठेऊन त्यात तेल गरम करून घ्या.
--- यात ठेचलेला लसूण घालून परतून घ्या.
--- आता कुर्ल्या आणि डेंगे घालून त्यात हळद व तिखट घालून चांगलं परता.
--- आता यात कुर्ल्या बुडतील इतकं पाणी, मीठ व आपण जी लाख काढून ठेवलीय ती घालून मिक्स करून घ्या.
--- झाकण ठेऊन मिडीयम गॅस वर २० ते २५ मिनिटं कुर्ल्या / खेकडे चांगले शिजू द्या.
--- कांदा खोबरं गरम मसाला वाटण अर्धा कप घेऊन त्यात थोडं पाणी घालून पेस्ट करून घ्या.
--- या साठी लागणाऱ्या कांदा खोबरं गरम मसाला वाटण ची पाककृतीच्या व्हिडिओची लिंक https://kokankanya.blogspot.com/2018/10/watan-gravy-masala.html
--- २० ते २५ मिनिटांनी वाटणाची पेस्ट व ३ ते ४ कोकम / आमसुलं घालून अजून ५ मिनिटं शिजू द्या.
--- तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने पाणी घाला. आपण बारीक पायांचा रस घालणार आहोत हे ध्यानात ठेऊन.
--- आता कुर्ल्या / खेकडे छान शिजलेत गॅस मंद करून एका बाजूने कुर्ल्या हलवत राहा व दुसऱ्या हाताने हळूहळू बारीक पायांचा रस ओतत राहा.
--- मंद गॅस वर सतत पूर्ण १ मिनिट रस्सा हलवत रहा. अन्यथा रस्सा फुटतो. आता गॅस बंद करून वरून चिरलेली कोथिंबीर घाला.
आपला अस्सल कोकणी पद्धतीचा कुर्ली / खेकडा रस्सा तयार आहे.
Comments
Post a Comment