कोंबडी रस्सा (चिकन रस्सा) - Kombdi Rassa (chicken masala)
यासाठी लागणार साहित्य पाहून घेऊ.
=========== साहित्य =============
- कोंबडी - अर्धा किलो
- आलं,लसूण,मिरची,कोथिंबीर पेस्ट - ३ चमचे
- हळद - पाव चमचा
- लाल तिखट - ४ चमचे
- तूप - १ चमचा
- हिंग - पाव चमचा
- दही - १ चमचा
- मीठ
- तेल - ४ चमचे
- कांदा - १ बारीक चिरून
- कांदा खोबरं गरम मसाला वाटण - २ मोठे चमचे
=========== कृती ============
--- प्रथम कोंबडी / चिकन २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या.
--- आता आलं - २ इंच , लसूण - ८ ते ९ पाकळ्या , हिरवी मिरची - २, कोथिंबिर - १ कप घेऊन त्याची पेस्ट करून घ्या.
--- कोंबडी / चिकन ला वरील पेस्ट ३ चमचे, हळद, लाल तिखट, दही, हिंग, तूप, मीठ लावून दीड ते दोन तास मॅरीनेट करत ठेवायचं .
--- गॅस वर पातेलं ठेऊन त्यात ४ चमचे तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा.
--- कांदा मऊ होईपर्यंत परतून झाला की गॅस मोठा ठेऊन त्यात मॅरीनेट केलेलं चिकन चांगलं परतून घ्यायचं. बाजूने तेल छान परतून घ्यायचं सुटेपर्यंत, यामुळे चिकनची चव अजून वाढते.
--- दुसऱ्या बाजूला जितका रस्सा हवा त्या अंदाजाने पाणी गरम करत ठेवा.
--- आपण चिकन मॅरीनेट करताना मीठ लावलेलं होत त्यामुळे रस्श्याची चव घेऊन अंदाजाने हवे असल्यास मीठ घाला.
--- पातेलीवर झाकणात पाणी ठेऊन ४० ते ४५ मिनिट कोंबडी / चिकन शिजू द्या.
--- तुम्ही कोंबडी / चिकन कुकर ला शिजवणार असाल तर ४ शिट्या काढा. चिकन छान शिजतं.
--- वरून चिरलेली कोथिंबीर घातली की मस्त चमचमीत, झणझणीत कोंबडी रस्सा / चिकन रस्सा तयार.
Comments
Post a Comment