मोहक सुगंधी उकडीचे मोदक व करंजी - Ukdiche Modak and Karanji


गणपतीला आवडणारे मोदक अगदी सोप्प्या व सविस्तर पद्धतीने मी घेऊन आलेय तुमच्यासाठी.
=========== साहित्य =============
1) 2 वाट्या किसलेल ओलं खोबरं (मध्यम आकाराचा नारळ )
2) 1 वाटी गूळ
3) 2 चमचे तेल
4) 2 चमचे तूप
5) 2 चमचे खसखस
6) 1 वाटी तांदळाचं पीठ
7) वेलची पावडर
8) मीठ
9) हळदीची पान ( पर्यायी )

=========== कृती ============
=== चूण
--- एका भांड्यात खोबरं गूळ आणि थोडं मीठ टाकून चांगलं एकजीव करून घ्या.


--- गॅसवर पॅन ठेवून त्यात तूप घालून गरम करा यात खसखस घालून १ मिनिट परता. --- गॅस मध्यम आचेवर करून त्यात गूळ खोबऱ्याचं मिश्रण घालून १मिनिट परता. यात वेलची पावडर मिक्स करा. आपल्याला मिश्रण ओलसर ठेवायचं आहे याची काळजी घ्या. --- झाकण घालून १ मिनिट वाफ येऊ द्या. --- एका मिनिटानंतर गॅस बंद करून चूण गार करत ठेवा.
=== उकड
--- एका जाड बुडाच्या पातेलीत ३ वाट्या पाणी उकळत ठेवा. --- उकळी आली की पाण्यात २चमचे तेल आणि अर्धा चमचा मीठ घाला.
--- आता न्यूज पेपर मध्ये तांदळाचं पीठ चाळून घेऊन ते उकळत्या पाण्यात सोडा.
--- लगेच झाकण ठेऊन मोठ्या आचेवर १ मिनिट वाफ येऊ द्या. --- एका मिनिटांनी गॅस बंद करून जास्तीच पाणी काढून घ्या. --- आता मंद आचेवर पीठ चांगलं मिक्स करून घ्या .
--- झाकण ठेऊन २ मिनिटं वाफ येऊ द्या. --- आता मिश्रण परातीत घेऊन गरम असतानाच (पेल्याच्या सहाय्याने) चांगलं मळून घ्या . (आवश्यक वाटलं तर आपण जे पाणी काढून ठेवलंय ते मळायला वापरा ) --- ४ ते ५ मिनिटं पीठ चांगलं मळून घ्या .
=== मोदक
--- मोदक आणि करंजीला आकार देण्यासाठी वरील व्हिडीओ पहा (time 5:27)
--- मोदक व करंजी करून झाले की एका पातेलीत पाणी उकळत ठेवा. 
--- आता चाळणीत हळदीची पान घालून त्यावर मोदक व करंजी ठेऊन त्यावर परत हळदीची पान घाला. (हळदीचे पान नसेल तर केळीचे पान घ्या ,नाहीतर मग चाळणीला तेल लावून त्यात मोदक व करंजी ठेवा.)

--- ही चाळणी पाणी उकळत असलेल्या भांड्यावर ठेऊन झाकण ठेवा.
--- मोदकांना १५ मिनिटं मोठ्या आचेवर वाफ येऊ द्या.

--- आपले मोदक व करंजी आता तयार आहेत .

मोदकावर तुपाची धार घालून त्याचा आस्वाद घ्या.



Comments

  1. Khupach Chan modak mazi Said asech karte pan mala paklya Jamar nahi mhanun mi khup depress hote Ani karat nahi. Tumchya sarhe peth soft hot nahi😔

    ReplyDelete

Post a Comment