सोलकढी - पाचक रुचकर झटपट होणारी - Solkadhi recipe



कोकणच नाही तर सर्वत्र आवडीने प्यायली जाणारी पाचक, पित्तशामक, रुचकर अशा झटपट होणाऱ्या सोलकढीची पाककृती आपण पाहूया. प्रत्येक घोटाला तृप्तीचा आनंद देणारी अशी सोलकढी.
चला तर करूया सुरुवात. यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया.
=========== साहित्य =============

  • १ कप किसलेलं ओलं खोबरं
  • १ हिरवी मिरची
  • ३ ते ४ लसूण पाकळ्या
  • १५ कोकम (आमसुलं)
  • २ चमचे साखर
  • मीठ
  • पाणी (अर्धा ते पाऊण लिटर)
=========== कृती ============
--- सर्वात प्रथम कोकम बाउल मध्ये घेऊन त्यात अंदाजे पाव कप गरम पाणी घालून उमळत ठेवा.
(यांच्याऐवजी बाजारात मिळणार तयार कोकम आगळ वापरू शकता.)
--- आता मिक्सरच्या ज्युसरच्या भांड्यात ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या आणि पाणी घालून रस काढून घ्या.
--- रस पातळ करू नका. यासाठी दोन वेळा पाणी घालून रस काढा. पाणी अंदाजे अर्धा ते पाऊण लिटर.
--- रसात २ चमचे साखर आणि चवीनुसार मीठ घाला. (रेडिमेड आगळ मध्ये मीठ असते तेव्हा ते वापरताना मीठ थोडं कमी घाला.)
--- आता कोकम (आमसुलं) रस गाळून नारळाच्या रसात घाला.
--- चांगलं मिक्स करा.
आपली सोलकढी तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी थोडावेळ फ्रिज मध्ये ठेवा. थंडगार सोलकढी अप्रतिम लागते.

Comments