कोळंबी फ्राय । Prawns Fry


झटपट होणारी आणि सर्वांना आवडणारी अशा कोळंबी फ्रायची पाककृती सोप्या व सविस्तर पद्धतीने या व्हिडिओमध्ये देत आहे.चला तर मग करूया सुरुवात.
=========== साहित्य =============

  1. कोळंबी - अर्धा किलो
  2. हळद - पाव चमचा
  3. लाल तिखट - २ चमचे
  4. आलं लसूण पेस्ट - १ चमचा
  5. कोकम / आमसुलं - ४ ते ५
  6. मीठ
  7. तांदळाचं पीठ / रवा
  8. तेल
=========== कृती ============
--- प्रथम कोळंबी सोलून त्यातील काळा धागा काढून टाका. ज्यामुळे कोळंबी पोटाला अजिबात बाधत नाही.
वरील व्हिडीओ मध्ये कोळंबी सोलायची सविस्तर माहिती दिलीय.

--- कोळंबी ३ ते ४ वेळा स्वछ धुवून घ्या.
--- ३ ते ४ कोकमं / आमसुलं २ चमचे पाण्यात भिजवून, चुरून त्याचा रस काढून घ्या.
--- कोकमाचा हा रस कोळंबीत घाला.
--- यात, हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट आणि मीठ घाला.
--- हा सगळा मसाला कोळंबीला चांगला लावून घ्या.
--- कोळंबीला मसाला लावून अर्धा ते पाऊण तास मुरत (मॅरीनेट) ठेवा. या मुळे मीठ मसाला कोळंबीत छान मुरतो.
--- आता तांदळाचं पीठ किंवा रवा घेऊन कोळंबीला कव्हर करून घ्या. जास्तीचं पीठ काढून टाकून टाका.
--- सर्व कोळंबीला कोट करून घ्या.
--- पॅन गरम करून त्यात २ चमचे तेल गरम करून घ्या.
--- आता एक एक कोळंबी घालून घ्या.
--- मिडीयम गॅस वर ५ ते ७ मिनिट चांगलं भाजू द्या.
--- पॅन हलवून कोलंबी चिकटली नाही ना पहा. आवश्यक वाटल्यास थोडं तेल घाला.
--- कोळंबी पलटून दुसऱ्या बाजूने ही ५ ते ७ मिनिटं भाजू द्या.
--- मस्त गरमा गरम कोळंबी फ्राय आता तयार आहे.

Comments