पारंपरिक घावणे - नारळाच्या दुधासोबत । झटपट नाश्ता । Ghavne with coconut milk
- १ वाटी तांदूळ (घरात वापरत असलेला कोणताही तांदूळ )
- मीठ
- ३ वाट्या पाणी
नारळाच्या दुधासाठी
- २ वाट्या किसलेल ओलं खोबरं
- ३/४ वाटी गूळ
- वेलची पावडर
- पाव चमचा मीठ
=========== कृती ============
घावणे
--- प्रथम तांदूळ स्वछ धुऊन रात्रभर भिजत ठेवा. किंवा ६ ते ८ तास भिजत ठेवा.
--- तांदळातील पाणी काढून टाकून त्याची अगदी बारीक पेस्ट करा
--- या पेस्ट मध्ये तिप्पट पाणी घाला. (३ वाट्या पाणी)
--- चवीनुसार मीठ. (अंदाजे अर्धा चमचा)
--- गॅस फुल करून त्यावर भीड, फ्राय पॅन गरम करून तेल लावून घ्या. (फ्राय पॅन, नॉनस्टिक तवा नवीन असल्यास, प्रत्येकवेळी मीठाचं पाणी शिंपडून लगेच फडक्याने पुसून घ्या.)
--- आता तांदळाच्या पिठाचं मिश्रण नीट मिक्स करून पेल्याच्या सहाय्याने तव्यात पातळ लेअर पसरावा.
--- लगेच झाकण ठेऊन १ मिनिट वाफ येऊ द्या.
--- एका मिनिटांनी झाकण काढून पाहिल्यावर घावण कडेने सुटलेले दिसेल, हाताने त्याची चौघडी घाला.
आपल घावण तयार आहे. प्रत्येक वेळी तांदळाचं पीठ चांगलं हलवून मग घावण घाला. या मिश्रणाचे अंदाजे १५ पातळ घावणे होतात.
आता आपण नारळाचं दूध करूया.
=========== कृती ============
नारळाचं दूध
--- ओल्या खोबऱ्याचं दोन वेळा पाणी घालून त्याचा रस काढून घ्या. (अर्धा ते पाऊण लिटर पाणी लागेल. नारळाचं दूध जास्त पातळ करू नये.)
--- यात गूळ, मीठ व वेलची पावडर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. (यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता.)
आपलं नारळाचं दूध आता तयार आहे.
Comments
Post a Comment