उपवासाची शेंगदाण्याची उसळ । Fasting Peanuts Usal


उपवासासाठी, झटपट होणाऱ्या अशा शेंगदाण्याच्या उसळीची पाककृती मी या व्हिडिओत देत आहे.
चला तर मग करूया सुरुवात. यासाठी लागणार साहित्य पाहून घेऊया. यानुसार २ ते ३ व्यक्तींसाठी उसळ होईल.
=========== साहित्य =============

  • शेंगदाणे - १ कप
  • हिरवी मिरची - २ ते ३
  • जिरं - १ चमचा
  • तूप - २ चमचे
  • ओलं खोबरं - पाव कप
  • मीठ
=========== कृती ============
--- शेंगदाणे रात्रभर किंवा किमान ५ ते ६ तास भिजत (उमळत) ठेवा.
--- कूकर मध्ये शेंगदाणे भिजतील इतकं पाणी घालून ३ शिट्या काढून शिजवून घेऊया.
(शेंगदाणे जास्त मऊ हवे असल्यास ४ ते ५ शिट्या काढा.)
--- जाड बुडाच्या पातेलीत तूप गरम करून घ्या.
--- तूप तापल्यावर त्यात जिरं घालून चांगलं फुलू द्या.
--- आता यात मिरचीचे तुकडे घाला.
--- चांगलं परतून यात शिजवलेले शेंगदाणे घाला. (जास्त पाणी घालू नका.)
--- चवीनुसार मीठ घालून परतून घ्या.
--- ताटलीच झाकण ठेऊन त्यावर पाणी घालून उसळ वाफेवर शिजू द्या.
--- गॅस मध्यम ते मंद आचेवर करून २ ते ३ मिनिटं उसळ शिजू द्या.
--- आता झाकण काढून उसळीत ओलं खोबरं घालून चांगलं मिक्स करा.
--- अजून २ ते ३ मिनिट वाफेवर उसळ शिजू द्या.
--- आता उपवासाची शेंगदाण्याची उसळ तयार आहे.

Comments