उपवासाचे मऊ शेंगदाणा लाडू | Fasting Peanut Ladoo


उपवासाच्या पदार्थांमधील पौष्टिक, रुचकर आणि झटपट होणाऱ्या शेंगदाण्याच्या मऊ लाडूची पाककृती मी या व्हिडिओत देत आहे. लहान मुलांना हे लाडू खूप आवडतात.
चला तर मग करूया सुरुवात. यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊ. यापासून १० ते १२ लाडू होतात.
=========== साहित्य =============

  • २ कप शेंगदाणे
  • १ कप किसलेला गूळ
  • २ चमचे तूप
  • मीठ
=========== कृती ============
--- शेंगदाणे चांगले भाजून घ्या.
--- भाजलेले शेंगदाणे ताटात काढून थोडे गार होऊ द्या.
--- शेंगदाण्याची सालं काढून मिक्सर मधून कुट करून घ्या. (मिक्सर चालू बंद चालू बंद करत कुट करून घ्या)
--- शेंगदाणे किंवा कुट आणि थोडा गुळ असं मिक्सर मधून बारीक करून घ्या.
(थोडं थोडं करून मिक्सर मधून बारीक करा. म्हणजे गुळामुळे मिक्सरवर लोड येणार नाही.)
--- शेवटच्या घाण्याला २ चमचे तूप घालून वाटून घ्या. (तूप लाडू वळता येतील इतपत घाला. तूप जास्त झालं तर वड्या पाडा.)
--- ते बाकी दाण्याच्या कुटात मिक्स करा.
--- या मिश्रणात थोडंसं (पाव चमच्यापेक्षा कमी) मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्या.
--- चांगलं मळून त्याचे लाडू वळा.
आपले शेंगदाण्याचे मऊ लाडू तयार आहेत.


Comments