नारळी भाताची पाककृती - Recipe of Narali Bhaat
कोकणात श्रावणी पौर्णिमेला नारळी भाताचा नैव्येद्य दाखविला जातो; त्याच पारंपारिक नारळी भाताची पाककृती या ब्लॉगमध्ये देत आहोत.
ही पाककृती करायला अगदी सोप्पी आहे. आणि आपण ती अगदी झटपट करू शकतो.
चला तर मग अजून जास्त न बोलता लगेचच सुरु करू. नारळी भाताला लागणारे साहित्य आपल्या घरात सहजच उपलब्ध असते.

- १ कप तांदूळ
- १ कप खोवलेला (खरवडलेला / किसलेला) ओला नारळ
- १ कप गुळ (किसलेला)
- ४ लवंगा
- २ टेबल स्पून शेंगदाणे (२ तास भिजवून सोललेले)
- ४-५ काजूगर
- ४ टेबल स्पून तूप
- वेलची पूड
- दीड कप पाणी
- चवीनुसार मीठ
नारळी भात बनविण्याची कृती:
- एका कुकर मध्ये २ चमचे तूप घेऊन त्यात ४ लवंगा घालाव्यात.
- आता तांदूळ स्वच्छ धुवून तो ही त्यात घालावा. आणि एक मिनिटभर छान परतून घ्यावा.
- दीड कप पाणी घालून कुकर ला २ शिट्ट्या येऊ द्याव्यात.
![]() |
कुकर मध्ये तुपात ४ लवंगा घाला |
![]() |
त्यात तांदूळ आणि पाणी घाला |
आपला भात तयार होईस्तोवर आपण पुढील तयारी करून घेऊया.
- एका भांड्यात खोबरं आणि गुळ छान कालवून घ्या. चांगलं एकजीव होऊदे.
![]() |
गुळ खोबरे एकजीव करून घ्या |
- आता (भात तयार झाल्यावर) एका जाड बुडाच्या पातेल्यात २ चमचे तूप छान गरम करून घ्या.
- त्यात शेंगदाणे आणि काजूगर घालून छान तांबूस होईतोवर परतून घ्या.
- नंतर आपण तयार केलेले गुळ खोबऱ्याचे मिश्रण घाला.
- आणि गुळ पूर्णपणे विरघळेपर्यंत थांबा.
![]() |
गुळ पूर्णपणे विरघळू द्या |
- गुळ विरघळल्यावर आता तयार भात त्यात घालावा आणि छान एकजीव होईतोवर हलवा.
- भांड्याला ताटली घालून २ मिनिटे चांगली वाफ येऊद्या.
- एकदा छान परतून घ्या आणि अजून २ मिनिटे वाफ द्या.
![]() |
त्यात भात आणि वेलची पूड घाला |
Comments
Post a Comment