कोकणी फुटी कढी - Konkani Futi Kadhi Recipe

कोकणी फुटी कढी - Konkani Futi Kadhi Recipe



माश्याच्या रस्स्याच्या चवीची पण तरीही पूर्णतः शाकाहारी अशी हि कोकणी फुटी कढी. मांसाहारी आणि शाकाहारी दोघांच्याही लगेच पसंतीस उतरेल अशी पाककृती.

चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहूया.


  • एक वाटी किसलेला ओला नारळ
  • ६ ते ७ लासूण पाकळ्या 
  • ४ चमचे धणे 
  • पाव चमचा हळद 
  • ३ चमचे तिखट (बेडगी मिरचीचे तिखट)
  • एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरुन 
  • एक मोठा टोमॅटो (अर्धा बारीक चिरुन आणि अर्धा मोठ्या फोडी)
  • २ चमचे तेल 
  • मीठ 
  • कोथिंबीर बारीक चिरुन 
फुटी कढी बनविण्याची कृती:
  • सर्वप्रथम खोबरं, लसूण, धणे, हळद, तिखट, अर्धा कांदा यांत थोडे पाणी घालून बारीक वाटण करून घ्यावे. 
वरील जिन्नस थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे


बेडगी मिरची पावडर वापरून असा छान रंग येतो

  • नंतर गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल गरम करून अर्धा कांदा परतून घ्या. 
  • त्यात टोमॅटो घालून नरम होईपर्यंत परता. 
  • आता यात बारीक वाटलेलं वाटण घालून १ मिनिट चांगलं परता. 
  • आता आवश्यकतेनुसार पाणी घालून झाकण ठेवून २ मिनिटं उकळी येऊ द्या. 
आवश्यकतेनुसार पाणी कमी अधिक करावे

  • २ मिनिटानंतर त्यात अर्ध्या टोमॅटोच्या मोठ्या फोडी, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून ३ ते ४ मिनिटे माध्यम आचेवर उकळू द्या. 
आणि गरम गरम भातासोबत आस्वाद घ्यायला तयार आहे "कोकणी फुटी कधी". 

Comments