आंबोळी पाककृती - Aamboli recipe

 आंबोळी पाककृती - Aamboli recipe


     
        आंबोळी हा कोकणातील एक पारंपरिक खाद्य पदार्थ. आपण आंबोळी चटणीसोबत खाऊ शकतो. तसेच चिकन मटण रस्सा सोबत असेल तर मग याची रंगत काही निराळीच. एवढंच काय तर आपण आंबोळी चहासोबत आणि काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत पण खाऊ शकतो.
        आज आपण हीच मऊ लुसलुशीत आंबोळी कोकणी पद्धतीने बनवायला शिकणार आहोत.

चला तर मग सर्वप्रथम आपण आंबोळी करायला लागणारे साहित्य पाहूया.
आंबोळी साहित्य 

  • ३ कप तांदूळ 
  • १ कप उडीद डाळ 
  • १/४ कप चणा डाळ 
  • १ टी स्पून मेथी दाणे 
  • ४ टी स्पून धणे 
  • १/४ कप पोहे 
  • चवीनुसार मीठ 
  • गरम पाणी 


वरील सर्व जिन्नस (मीठ आणि गरम पाणी सोडून) हाताशी काढून घ्या. आणि आता करूया सुरुवात.

आंबोळी बनविण्याची कृती:
  • सर्वप्रथम तांदूळ, उडीद डाळ, चणा डाळ स्वच्छ धुवून एकत्र करून घ्या. 
  • आता त्यात पोहे, धणे आणि मेथी दाणे घालून ८ तास भिजत ठेवा. 


८ तासांनी हे धान्य असे मस्त भिजून तयार होईल. आता आपण हे बारीक वाटून घेणार आहोत.
हे धान्य तुम्ही ज्युसरच्या मोठ्या भांड्यातपण वाटून घेऊ शकता. आणि लक्षात ठेवा कि वाटताना  आपल्याया गरम पाणीच वापरायचे आहे. 
ज्युसर भांड्यात आपण वाटू शकतो 

साधारण ह्या फोटोप्रमाणे flowing consistency असावी 

  • आता हे batter आपण किमान १० तासांसाठी किंवा रात्रभर जरा उबदार ठिकाणी ठेवायचे आहे. 
  • १० तासांनी हे पीठ आंबोळी करायला एकदम तयार झालेले आपल्याया दिसेल. 
  • आपण ठेवलेले पीठ साधारणपणे दुप्पट झालेले दिसेल. त्यामुळे आपण भांडे त्या आकाराचेच निवडावे. 
  • आता ह्या तयार झालेल्या पीठात साधारण पणे १ ते दीड चमचा मीठ घालून एकजीव करून घ्यावे. 
चला तर लगेच एक गरमा गरम आंबोळी बनवूया. 
  • यासाठी आपण एक frying pan, डोसा तवा किंवा भीड वापरू शकतो. 
  • तवा गरम झाल्यावर गरज वाटल्यास त्याला थोडंसं तेल लावा. 
  • आणि एका पेल्याने पीठ त्यात ओता . 

पेल्याने पीठ ओता. जास्त पातळ करू नका. 
  • पीठ ओतत असताना काळजी घ्या कि आंबोळी जास्त पातळ होऊ देऊ नका. 
  • त्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर माध्यम आचेवर शेकू द्या. 
  • मिनिट भराने पलटून परत एक मिनिटभर दुसरी बाजू शेकू द्या. 

आणि आपली आंबोळी जेवणाची चव वाढवायला तयार आहे. 

Comments